मुंबई

जोखमीच्या क्षयरोग रुग्णांना बीसीजी लस

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : क्षयरोगमुक्त भारतासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १८ वर्षांवरील जोखमीच्या क्षयरोग रुग्णांना बीसीजी लस देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातदेखील सर्वेक्षण करून जोखमीच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग विभागाने दिली आहे.

२०२५पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत १८ वर्षांवरील जोखमीच्या गटातील रुग्णांना बीसीजी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेला ठाणे जिल्ह्यात मेपासून सुरुवात होणार आहे. आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामीण व शहरी भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. अडीच लाख जणांना लस देण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी गीता काकडे यांनी दिली. तसेच लस देण्यापूर्वी लाभार्थ्यांकडून संमतीपत्र लिहून घेणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

काय आहेत लाभार्थ्यांचे निकष?
- मागील पाच वर्षांतील क्षयरोग रुग्ण
- मागील तीन वर्षांतील क्षयरोग रुग्णांच्या सहवासातील व्यक्ती
- बॉडी मास इंडेक्स १८ वर्षांपेक्षा कमी असलेली व्यक्ती
- धूम्रपान करणारी व्यक्ती
- मधुमेह असणारे व्यक्ती
- ६० वर्षांहून अधिक वय असलेले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी झिरो लीक सिस्टीम; परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल, ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाइन वितरणाचा प्रस्ताव

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT