मुंबई

नंदीबाबा चौकातील अडथळे दूर कधी होणार?

CD

नंदीबाबा चौकातील अडथळे दूर कधी होणार?
कोलशेत-ढोकाळी हा अंतर्गत रस्ता कोंडीच्या विळख्यात

ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) : घोडबंदर रोडवर अनेक प्रकारची कामे सुरू असूनही या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असते; मात्र कोलशेत-ढोकाळी हा अंतर्गत रस्ता कोंडीच्या विळख्यात सापडत आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांचा योग्य समन्वय नसल्याने या परिसरातील नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कामे अर्धवट असून रस्त्याच्या बाजूला दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केलेली असतात.

ठाणे शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. घोडबंदर रोड, मुंबई- नाशिक महामार्ग, कापूरबावडी- कशेळी मार्ग आदी ठिकाणी रस्ता रुंदीकरणाच्या कामांनी वेग घेतला आहे. ठाणे- वडपेदरम्यानचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गही पूर्णत्वाकडे जात आहे. असे असतानाही या मार्गावर कामांच्या मानाने म्हणावे तशी कोंडी होत नाही; मात्र अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची कोंडी होत आहे. सकाळ- संध्याकाळी अशा रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे.

ढोकाळी- कोलशेत रोड हा घोडबंदर मार्गावरील वाहतुकीला मदत करणारा आहे. या रस्त्यावरून ब्रह्मांड, हिरानंदानी, लोढा अमारा, मनोरमानगर, कोलशेत गाव, ढोकाळी गाव आदी परिसरातील लोक या रस्त्याचा वापर करतात, त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीची काही प्रमाणात सुटका होण्यास मदत होते. तर कशेळीकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही या मार्गामुळे मदत होते; परंतु या मार्गावर नंदीबाबा चौकातील रस्त्यावरचे काम अर्धवट स्थितीत आहे. हा चौक रुंद करण्यासाठी येथील दुकाने सुमारे चार ते फूट कमी केली आहेत; परंतु अनेक महिन्यांनंतरही या चौकाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण केलेले नाही.

फेरीवाल्यांचा अडथळा
ढोकाळी नाक्याकडून येणाऱ्या रस्त्यावर फुटपाथची कामे सुरू आहेत. त्यातच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सोसायटीतील नागरिक रस्त्यावरच दिवस-रात्र गाड्या पार्क करतात. त्यामुळे संध्याकाळी येथे मोठी वाहतूककोंडी होते. नंदीबाबा चौक रस्त्यावर चढण आहे. हा चौक रुंद करूनही तेथील अडथळे दूर केलेले नाहीत. रुंद केलेल्या जागेवर फेरीवाले बसत आहेत. तसेच येथील विद्युत पेटीही काढलेली नाही. त्यामुळे येथे वाहनांची कोंडी होते. तसेच कोंडीमुळे वाहने धीम्या गतीने पुढे सरकत असताना चढणावर वाहने बंद पडत असतात.

...तरच नागरिकांना दिलासा
कापूरबावडी करून येणारा रस्ता बुधवारी (ता. २४) सुरू केलेला आहे; मात्र या रस्त्याने येणारी वाहतूक ढोकाळी गाव, हायलँडकडे जाण्यासाठी नंदीबाबा चौकाचाच वापर करावा लागेल. त्यामुळे पुन्हा या चौकात वाहतूक कोंडी होण्याची होणार आहे. चढणावर रुंद केलेल्या रस्त्यावरील अडथळे काढून टाकल्यास हा चौक कोंडीमुक्त होऊन वाहनचालक, दुकानदार आणि पायी चालण्यासाठी रस्त्याचा वापर करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. या परिसरात नमो सेंट्रल पार्क नावाचे भव्य उद्यान आहे. या उद्यानाला भेटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक वाहने घेऊन येतात. त्याचा भारदेखील याच चौकावर पडतो.

कापूरबावडी नाका येथील अडथळा पाडून कोलशेत- कशेळी मार्ग बुधवारपासून सुरू केला आहे. यामुळे हायलँड, ढोकाळी, लोढा अमारा, ब्रह्मांड, मनोरमा नगर, आझाद नगर हा परिसर वाहतूक कोंडीपासून मुक्त होणार आहे. नंदीबाबा चौकदेखील रुंद केला आहे. रुंद केलेल्या भागाचे लवकरच काँक्रीटीकरण केले जाईल. तेथील अडथळे दूर केले जातील.
-डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT