panvel loksabha crime  sakal
मुंबई

Crime News: निवडणूक शाखेची मोठी कारवाई; पनवेलमध्ये ३५ लाखांची रोकड जप्त

निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा अलर्ट झाली आहे|Government machinery has been alerted to conduct the election process smoothly.

CD

Kamothe: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघात निवडणूक शाखेच्या वतीने स्थिर सर्वेक्षण पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकाने पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे केलेल्या दोन विविध कारवायांत चारचाकी वाहनांतून सुमारे ३५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रचाराला रंगत चढली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत करत असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा अलर्ट झाली आहे.

प्रामुख्याने महसूल व पोलिस विभाग ॲक्टिव्ह मोडवर आहे. चेक पोस्टवर वाहनांची तपासणी सुरू आहे. बुधवारी (ता. २४) सायंकाळी ७ वाजता पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ३ यांच्या वाहनांची नियमित तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, एका निळ्या रंगाच्या चार चाकी गाडीमध्ये तपासणी पथकाला बेहिशोबी १२ लाख ९९ हजार ९०० रुपये आढळून आले. या गाडीतून आझाद कुमार राजेंद्र कडवा (वय २४) व राजेश कुमार इंदलीया (वय २० दोघेही रा. स्टील मार्केट कळंबोळी) हे प्रवास करत होते. पथकाने या दोघांची प्राथमिक चौकशी केली असता जप्त करण्यात आलेली रक्कम ही डीडीव्हीएन स्टील कंपनीची असल्याचे उघड झाले आहे.
-----------
राजकीय संबंध नसल्याचे स्पष्ट
स्थिर सर्व्हेक्षण पथक क्र. ५ यांनी सोमवारी (ता. २२) एका कारमधून २३ लाख रुपये जप्त केले. ही कार योगेश हारे (वय ३२, रा. अलिबाग) यांची असल्याचे तपासणीदरम्यान समोर आले आहे. दोन्ही घटनांत जप्त करण्यात आलेली रक्कम ही व्यक्तिगत आहे. त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा राजकीय व्यक्तीशी संबंध नसल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT