मुंबई

आदिवासी समाजाचा मतदानावर बहिष्कार

CD

बोळिंज, ता. २५ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेतील प्रभाग समिती एफ अंतर्गत येणाऱ्या पेल्हार गाव आणि १७ पाडे आदिवासी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. पेल्हार परिसरामध्ये सतत आदिवासींच्या जमिनी लुटून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. इतकेच नाही तर नदी, नाल्यांच्या ठिकाणीसुद्धा काँक्रीटचे बांधकाम केले आहेत. यामुळे आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यावर प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने समाजाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
नालासोपारा पूर्वेला असलेल्या पेल्हार गाव आणि १७ पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही वर्षांमध्ये वसई-विरार महापालिकाअंतर्गत येणाऱ्या या परिसरांमध्ये सतत अनधिकृत बांधकाम होत आहे. यामध्ये सरकारी आणि आदिवासी जमिनी नावावर करून घेणे आणि त्या‍ ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. एवढेच नाही, तर नैसर्गिक नाले बुजवून बांधकाम करण्यात आले. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही पालिका भूमाफिया आणि बिल्डरांना संरक्षण देते. प्रशासन यावर कोणतेही ठोस पावले उचलत नाही. म्हणूनच या गावाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. त्याबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला आहे. १७ पाड्यांतील आदिवासींनी स्वाक्षरी मोहीम राबवत ते पत्र निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवलेले आहे.

‘नेत्यांकडून न्यायाची अपेक्षा नाही’
महापालिकेतील अधिकारी रमेश म्हणाले व आयुक्त अनिल कुमार पवार हे अनधिकृत बांधकामाला संरक्षण देत आहेत. अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही यावर कारवाई होत नाही. त्यामुळे अनेक आदिवासींना आपल्या जमिनी गमवाव्या लागल्या आहेत. भूमाफियांकडून त्यांच्या जमिनी हिसकावल्या गेल्या आहेत. प्रशासन व सरकारकडून योग्य पावले उचलले जात नाही. त्यात स्थानिक राजकीय नेते कोणत्याच कामाचे नाही. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. त्या‍मुळे समाजाने मतदानावर बहिष्कार टाकल्याचे गणेश बुरखुड यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: हम पहला ही उड़ा देंगे… राहुल द्रविडशी पहिल्याच भेटीत काय म्हणालेला वैभव? सॅमसनने केली पोलखोल; Video

Gold Silver Rate: सोनं १६०० रुपये तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त, भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Kolhapur Adamapur Yatra : बाळूमामांच्या यात्रेत विषबाधा; रथोत्सवावेळी वाटप केलेल्या लस्सीमुळे शंभरांवर भाविकांना विषबाधा

Gautam Gambhir: सहा षटकांत सामना जिंकवण्याची क्षमता; प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून संजू सॅमसनचे कौतुक

Hapus Mango : गुढीपाडव्याला आंबा होणार महाग! यंदा हापूस उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांनी घट

SCROLL FOR NEXT