mumbai crime  sakal
मुंबई

Crime News: चिरनेर-दिघाटी रस्त्यावर सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह, तपास सुरू

CD


Uran News: चिरनेर-दिघाटी रस्त्यावर अज्ञात महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. यामुळे चिरनेर- दिघाटी परिसरात एकच खळबळ माजली होती. उरण पोलिसांनी संबंधित अज्ञात महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

चिरनेर-दिघाटी रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मागील आठवड्यात वर्दळीच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती. त्‍यामुळे स्‍थानिकांनी पाहणी केली असता चिरनेर- दिघाटी रस्त्यालगत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला.

महिलेचा मृतदेह पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती उरण पोलिसांना दिली. उरण पोलिसांनी छिन्नविछिन्न अवस्थेतील अज्ञात महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचा पंचनामा करून उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

संबंधित महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्यामुळे महिलेची हत्‍या झाली आहे की तिने आत्महत्या केली असावी, याचा तपास उरण पोलिस करत आहेत. संबंधित महिलेची माहिती असल्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT