मुंबई

पोलिस कर्मचाऱ्याला एक कोटीचा गंडा

CD

पोलिस कर्मचाऱ्याला एक कोटीचा गंडा
बँकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; स्वस्तातील फ्लॅट पडला महागात
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : बँकेने जप्त केलेले फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने तसेच खालापूर येथील शेतजमीन खरेदी करण्यासाठी पैशाची गरज असल्याचे सांगून पोलिस कर्मचाऱ्याकडून तब्बल एक कोटी १७ लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यावर नेरूळ पोलिसांनी फसवणुकीसह अपहार तसेच बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सदर बँक अधिकाऱ्याची पत्नी व दोन मुली यांनादेखील या प्रकरणात सहआरोपी केले आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बँक मॅनेजरचे नाव रमाकांत परिडा असे असून तो वाशीतील एका बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर फसवणूक झालेले पोलिस शिपाई सुंदरसिंह ठाकूर हे नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस शिपाई ठाकूर हे चार वर्षांपूर्वी वाशी वाहतूक शाखेत कार्यरत असताना त्यांची बँक मॅनेजर रमाकांत परिडा याच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाल्यानंतर परिडा याने ठाकूर व त्यांच्या इतर पोलिस सहकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर परिडा याने पोलिसांना बँकेने जप्त केलेले फ्लॅट कमी किमतीत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्‍यानंतर वेगवेगळी कारणे देऊन परिडा याने ठाकूर तसेच अन्‍य एका पोलिस कर्मचाऱ्याकडून करोडो रुपये उकळले. मात्र, चार वर्षांमध्ये परिडाकडून फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच ठाकूर यांनी नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्‍यानंतर पोलिसांनी परिडा याच्यासह त्‍याच्‍या पत्‍नी व दोन मुलींवर गुन्‍हा नोंद केला आहे.
...........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine Ceasefire: रशिया अन् युक्रेन यांच्यात युद्धविराम सुरू... डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीची महत्त्वाची भूमिका

Supreme Court On Medicine Prices : सरकारच्या डोळ्यादेखत हे कसं घडतंय? औषधांच्या किंमतीवरून सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलं

Thane Purnekar Case: पूर्णेकर हत्येचा ठाण्यात रस्त्यावर उद्रेक, राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतल्याने भडका; घोडबंदरसह मुंबई-नाशिक महामार्ग ठप्प

Marathi News Live Updates : साय डोंगरावरील वृक्षतोडीची राज ठाकरेंकडून पाहणी, पर्यावरणाच्या मुद्द्यावर आज कर्जतमध्ये जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप-शिवसेनेत चुरस, काँग्रेसचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर; 'पदवीधर'चे काय?

SCROLL FOR NEXT