मुंबई

कोस्टल रोड-वांद्रे वरळी सी लिंक रोड जोडणार

CD

महाकाय गर्डर आज बसविणार; मरिन ड्राईव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत होणार प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईचा कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक उद्या शुक्रवारी (२६ एप्रिल) गर्डरने जोडले जाणार आहेत. दोन हजार मेट्रिक टन वजनाचा आणि १३६ मीटर लांबीच्या महाकाय गर्डरने जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे लवकरच वाहनचालकांना मरिन ड्राईव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत जाता येणार आहे. यामध्ये मरिन ड्राईव्ह ते वांद्रे या ठिकाणी रस्ते मार्गाने जाण्यासाठी पाऊण तासाऐवजी केवळ बारा मिनिटांमध्ये पोहचता येणार आहे. त्यामुळे पूर्व उपनगराला दिलासा मिळणार आहे.

कोस्टल रोडचे ८८ टक्के काम पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यात काम आले आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे; तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे- वरळी सी-लिंक जोडला जाणार आहे. या प्रकल्पातील टप्पा असलेल्या १३६ मीटरच्या सर्वात मोठ्या बो स्ट्रिंग आर्च गर्डरची बांधणी रायगड जिल्ह्यातील न्हावा येथे करण्यात आली आहे. न्हावा जेट्टीवरून हा गर्डर बार्जमध्ये टाकून वरळी येथे आणला गेला आहे. शुक्रवारी हा दोन हजार मेट्रिक टन वजनाचा महाकाय गर्डर जोडला जाणार आहे.
...........
वेळ आणि इंधनाची बचत होणार
कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे गर्डर जोडला जाणार असल्याने लवकरच वांद्र्याहून दक्षिण मुंबईत प्रवास करता येणार आहे. यामुळे येथील रोजची होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी-लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, करमुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे.
.........
पहाटे चार वाजता गर्डर बसविणार
अरबी समुद्रात भरती व ओहोटीचा अंदाज घेऊन हा गर्डर शुक्रवारी पहाटे ४ ते सकाळी ७ या वेळेत हा गर्डर बसवण्यात येणार आहे. वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी पिलर ७ व पिलर ९ च्या मध्ये हा गर्डर बसवण्यात येणार आहे. गर्डरला १०० वर्षांची गॅरंटी असणार आहे. गर्डरला जपानी तंत्रज्ञानाने कोटिंग करण्यात आले आहे. पुढील २५ ते ३० वर्षें गंज पकडणार नाही. तसेच तो पुढील १०० वर्षें टिकेल, इतका मजबूत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

SCROLL FOR NEXT