मुंबई

बविआकडून राजेश पाटील यांचे नाव निश्‍चित

CD

विरार, ता. २५ (बातमीदार) : पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे उमेदवार असावेत, अशी शिफारस पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याकडे केली असल्याचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी गुरुवारी (ता. २५) ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यामुळे पाटील यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा होण्याचे बाकी आहे, असे सांगण्यात आले आहे. बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते; पण सर्वांनी मिळून राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे जाधव यांनी सांगितले.

पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या (ठाकरे) भारती कामडी यांची उमेदवारी मागेच जाहीर झाली आहे. महायुतीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यात बहुजन विकास आघाडीनेही युती किंवा आघाडीत न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे बविआकडून उमेदवार कोण असणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. माजी खासदार बळीराम जाधव, माजी मंत्री मनीषा निमकर, वाडा पंचायत समितीचे माजी सभापती संतोष बुकले, जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव, बोईसरचे आमदार राजेश पाटील व पांडुरंग गोवारी यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती; परंतु या सर्वांनी एकत्र येत आमदार राजेश पाटील यांच्यावर नावावर सहमती दर्शवल्याचे बळीराम जाधव यांनी सांगितले. मला पक्षाने अनेकदा संधी दिली आहे. त्यामुळे या वेळी तरुणांना संधी द्यावी, म्हणून आम्ही राजेश पाटील यांच्या नावाची शिफारस केल्याचेही जाधव यांनी सांगितले. उमेदवारीची औपचारिक घोषणा बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर हे १ मे रोजी करणार आहेत.

राजेश पाटील हे सध्या बोईसर येथून आमदार आहेत. त्यांच्या घरात राजकारणाचा वारसा आहे. पाटील यांचे आजोबा हिराजी पाटील हे वसई पंचायत समितीचे उपसभापती होते. तर राजेश पाटील यांनी तत्कालीन ठाणे जिल्हा परिषद सदस्य, वसई पंचायत समिती सभापती व आता बोईसरचे आमदार असा राजकीय प्रवास केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT