मुंबई

पश्चिम रेल्वेत आचारसंहितेचे तीनतेरा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली असतानाच लोकलमध्ये अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार मेळाव्याच्या जाहिराती झळकत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर निवडणूक आयोग कोणती कारवाई करणार, याकडे प्रवाशांमधून विचारणा होत आहे.
निवडणूक आयोगाकडून १६ मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात सर्व प्रकारच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींवरील राजकीय पक्षांच्या जाहिराती, खासगी इमारतींवरील परवानगीशिवाय लावलेल्या जाहिराती, सार्वजनिक ठिकाणच्या जाहिराती काढण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारे डिजिटल फलक, राजकीय नेत्यांच्या प्रतिमा आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून झाकून टाकण्यात आल्या होत्या. असे असताना पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय लोकलमधील जाहिरातींमध्ये (स्क्रिनवर) अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेल्या रोजगार मेळाव्याच्या जाहिराती अजूनही झळकत आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून याप्रकरणी कारवाई होणार आहे का, अशी विचारणा केली जात आहे.
-----------------
रेल्वे प्रशासनाला उशिराचे शहाणपण
उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी आणि महसुलासाठी पश्चिम रेल्वेने लोकलमध्ये स्क्रीन लावली आहे. अशातच आचारसंहिता लागली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार मेळाव्याची जाहिरात सुरूच असल्याने याबाबतच्या अनेक तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. सुरुवातीला रेल्वेने याकडे दुर्लक्ष केले, पण आता याबाबतचे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने जाहिराती हटवण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
---------------------------
रेल्वेत सुरू असलेल्या जाहिराती आमच्या निदर्शनाश आल्या आहेत. त्या जाहिराती तत्काळ बंद करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
- सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

Devendra Fadnavis: पक्षांतर्गत सत्ताबदलात अपयश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtrachi Hasyajatra : कष्टाच्या पैशातून घेतला महागडा फोन अन् सुरू झाली टीका; गौरव मोरेच्या त्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मने

Chhatrapati Sambhajinagar: बिडकीन, शिवराईतील शीतगृहांवर FDAचा छापा; ४.१९ कोटींचा अन्नसाठा जप्त, दोन्ही संस्थांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT