मुंबई

मध्य रेल्वेवर १२ अनारक्षित विशेष ट्रेन !

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर-गोरखपूर, एलटीटी-गोरखपूर आणि सीएसएमटी- दानापूर दरम्यान अतिरिक्त बारा अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व गाड्या अनारक्षित म्हणून चालवण्यात येणार असून अतिजलद मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह यूटीएस प्रणालीद्वारे बुक केल्या जातील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक ०१०१५ अनारक्षित विशेष ट्रेन २७ एप्रिल, १ मे आणि ४ मे रोजी दादर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०१६ अनारक्षित विशेष गोरखपूर येथून २९ एप्रिल, ३ मे आणि ६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२५ वाजता दादर येथे पोहोचेल. यासोबत ट्रेन क्रमांक ०१४२७ अनारक्षित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई २६ एप्रिल आणि १ मे रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१४२८ अनारक्षित विशेष गोरखपूर २८ एप्रिल आणि ३ मे रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२५ वाजता पोहोचणार आहे. ट्रेन क्रमांक ०१०५१ अनारक्षित विशेष २८ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दानापूर येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०५२ अनारक्षित विशेष गाडी ३० एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT