मुंबई

मुंबईतील जागांचा तिढा सुटेना

CD

मुंबईतील जागांचा तिढा सुटेना
आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईत उद्यापासून (ता. २६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे; मात्र मुंबईतील अनेक मतदारसंघांत अजून गोंधळाची स्थिती आहे. महायुती आणि आघाडीने अद्याप सर्व उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
दक्षिण मुंबई या मतदारसंघात शिंदे गटाने आमदार यामिनी जाधव यांचे नाव जवळजवळ निश्चित केल्याचे कळते. मात्र, ते अद्याप जाहीर केलेले नाही. भाजपनेही या जागेवरील दावा सोडलेला नाही. येथे भाजपचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रचार सुरू ठेवला आहे. यांच्याबरोबरच मिलिंद देवरा, मकरंद नार्वेकर, यशवंत जाधव, बाळा नांदगावकर यांच्या नावांचीही चर्चा आहे. शिंदे गटाकडून अजूनही कोणत्याही उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही. ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी मात्र आपल्या प्रचारावर जोर दिला आहे.
उत्तर मुंबईत भाजपचे पियूष गोयल हे रिंगणात आहेत. या मतदारसंघासाठी काँग्रेसही दावेदार आहे; मात्र काँग्रेसने उत्तर मुंबईत उमेदवार जाहीर केलेला नाही. येथून काँग्रेसचे अस्लम शेख यांच्या नावाची चर्चा आहे. ठाकरे गट विनोद घोसाळकर यांच्या नावासाठी आग्रही आहे. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात अजूनही या जागेविषयीचा तोडगा निघालेला नाही. उत्तर पश्चिममधील पेचही अजून तसाच आहे. कारण शिंदे गटाचा येथे उमेदवार अजूनही ठरलेला नाही. येथे ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे; मात्र त्यांच्याविरोधात चेहरा कोणता द्यायचा याचा शोध सुरू आहे. संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा आहे; मात्र त्यांना भाजप आणि मनसेमधून विरोध आहे. मोहित कंभोज हेही या जागेसाठी प्रयत्न करीत आहेत.
...
वर्षा गायकवाड यांना उमेदवारी
उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. येथे उमेदवारीसाठी चेहऱ्याचा शोध सुरू आहे. आशिष शेलार, अमित साटम यांच्या नावांचीही भाजपमध्ये चर्चा आहे. उज्ज्वल निकम यांचेही नाव येथे चर्चेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT