मुंबई

Mumbai News: कोण असणार भाजपचा उमेदवार? उत्तर मध्यमध्ये महाजन की शेलारांना मिळणार संधी?

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मुंबईत होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवार निश्चित करण्यात प्रचंड अडचण येत असून आज उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने शहर अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा करताच भाजप पुन्हा पूनम महाजन यांना उतरवून महिलांचा सामना घडवणार की मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांना मैदानात आणणार, याची उत्सुकता आहे.

दक्षिण मुंबईची जागा भाजप घेणार की शिवसेना शिंदे गटाकडे सोपवली जाणार याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मिलिंद देवरा, यामिनी यशवंत जाधव यांच्या नावाची पुन्हा चर्चा होत असून भाजपत मंगलप्रभात लोढा आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ही दोन नावे पुढे आहेत. शिंदे गटाला १६ जागा लढायच्या असल्याने आता दक्षिण आम्हालाच मिळायला हवी, असा आग्रह कायम आहे, तर उत्तर पश्चिम मुंबईत रवींद्र वायकर यांच्यासाठी शिंदे गटाचा आग्रह आहे. मराठी आणि मुस्लिम मतदार एकगठ्ठा महाविकास आघाडीला मतदान करतील, असा अंदाज आहे.

भाजप आणि शिंदे गटाला मुंबईतील मतदारसंघांवर वर्चस्व हवे असल्याने शिवसेना ठाकरे गटाला हरवणाऱ्या उमेदवारांचा शोध घेणे सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळत असल्याची चर्चा असल्याने भाजप-शिंदे गटाला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनेक प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या एकत्रित मतांची बेरीज झाली तर ते आव्हान असेल. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते उत्तर मध्य मुंबईत गर्दी करणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपला जिंकू शकणारा उमेदवार दाखल करणे आवश्यक ठरणार आहे.



दक्षिण मुंबईत भाजपची बैठक


लोकसभेचा दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेकडे सोपवायचा की आपण लढायचा, उमेदवार मराठी की अमराठी, असा विषयही चर्चेत येणार आहे. भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत आज रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg ZP : मार्च २०२६ची डेडलाईन जवळ; सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ कोटी निधीवर ‘काउंटडाउन’ सुरू!

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

तिने ज्या हिमतीने परिस्थिती सांभाळली... विकी कौशलने केलं नवी आई कतरीनाचं कौतुक; म्हणतो- बाळासाठी...

Farmer Protest : कर्जमाफीत पळवाटा शोधू नका; शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला 'न भूतो न भविष्यती' आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडापलं

SCROLL FOR NEXT