मुंबई

वडाळ्यात दुकानाला भीषण आग, वृद्धाचा मृत्यू

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : वडाळाच्या ॲन्टॉप हिल येथील जय महाराष्ट्र नगरमधील एका किराणा दुकानाला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे स्वयंपाकाच्या दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये पन्नालाल वैश्य (वय ७०) या वृद्धाचा मृत्यू झाला. तर या आगीत झोपड्यांचे नुकसान झाले आहे.
दुकानाला आग लागल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला. हा विभाग दाटीवाटीचा असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. दुकानातील आग विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने भडका उडाला. स्वयंपाकाच्या दोन गॅस सिलिंडरचेही स्फोट झाले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलिस, रुग्णवाहिका व संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य हाती घेतले. दुकानातील वरच्या मजल्यावर पन्नालाल वैश्य अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले, मात्र ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : भारत-अमेरिका व्यापार करारावर आज दिल्लीत चर्चा

SCROLL FOR NEXT