Navi Mumbai Crime sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: इतरांबरोबर संबंध असल्याच्या संशय, प्रियकराने केली महिलेची हत्या

Uran News: उरणमधील महिलेच्या हत्या प्रकरणाची उकल | Woman's murder case solved in Uran |

सकाळ वृत्तसेवा

Crime News: उरणमधील चिरनेर ते खारपाडा रोडलगत दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात उरण पोलिसांना यश आले आहे.

मृत महिलेचे इतरांबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून तिचा प्रियकर असलेल्या टॅक्सीचालकाने तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी टॅक्सीचालक निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून अटक केली आहे.

चिरनेर ते खारपाडा रस्त्यालगत गुरुवारी (ता. २५) सकाळी सहाच्या सुमारास अज्ञात महिलेचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी या महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले होते. या तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाला या महिलेचे नाव पूनम चंद्रकांत क्षीरसागर (वय २७) असल्याची माहिती मिळाली.

पूनम हिचे नागपाडा येथे राहणाऱ्या निजामुद्दीन अलीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहितीही तपासात समोर आली. १८ एप्रिल रोजी पूनम कामावर गेली असताना तिला टॅक्सीचालक निजामुद्दीन अली हा घेऊन गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी निजामुद्दीन अली.

याला मानखुर्द येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानेच पूनमची हत्या करून तिचा मृतदेह चिरनेर येथे टाकून दिल्याची कबुली दिली. याप्रकरणी निजामुद्दीन अली याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

खडवली येथे हत्या


पूनम क्षीरसागर हिचे इतरांसोबत संबंध असल्याची माहिती आरोपी निजामुद्दीन अली याला मिळाली होती. त्यामुळे त्याने पूनमला १८ एप्रिल रोजी फिरायला नेण्याच्या बहाण्याने टॅक्सीमधून कल्याण खडवली येथे नेले होते. त्याठिकाणी निजामुद्दीन अली याने पूनमची हत्या केल्यानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह त्याने उरणच्या चिरनेर भागातील झुडपात टाकून पलायन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Sangli Miraj Kupwad Politics : जयंत पाटील–विश्वजीत कदम–विशाल पाटील एकत्र; महायुतीचा गेम! दोन माजी महापौरांना लावले गळाला

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT