Crime News crime
मुंबई

Crime News: ब्रेकअपचा बदला, प्रेयसीचे अश्लील फोटो केले व्हायरल; गुन्हा दाखल!

प्रकारामुळे संतप्त झालेल्या अनुरागने या मुलीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले |Enraged by the incident, Anurag started a fake Instagram account in the girl's name

सकाळ वृत्तसेवा

Panvel News: अल्पवयीन प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करत तिचे अश्लील फोटो व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली. अनुराग मोरे (वय २२) असे आरोपी तरुणाचे नाव असून, खांदेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अनुराग मोरे हा सध्या सोलापूर येथे राहण्यास आहे. १७ वर्षीय पीडित मुलगी नवीन पनवेल भागात राहण्यास असून, सध्या ती शिक्षण घेत आहे. आरोपी अनुराग हा पूर्वी नवीन पनवेलमध्ये राहण्यास होता. त्या वेळी त्याने पीडित मुलीसोबत मैत्री करून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. मात्र, अनुराग हा पीडित मुलीवर नेहमी संशय घेऊन तिला मारहाण करत होता. त्यामुळे पीडितेने त्याच्याशी संपर्क तोडला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अनुरागने या मुलीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले.

त्यानंतर त्याने या मुलीसोबतचे अश्लील फोटो तसेच मेसेज व्हायरल केले. सोबतच त्याने हे फोटो पीडित मुलीचे काका व वडिलांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले. या प्रकारानंतर या मुलीने आपल्या आई-वडिलांसह खांदेश्वर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी अनुराग मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या सोलापूर येथे असल्याने अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT