Mumbai Crime Esakal
मुंबई

Mumbai Crime: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी कुटुंबाला पोलीसांनी केली अटक!

CD

Mumbai Crime: मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या पाच जणांच्या एका कुटुंबाला कांदिवली पोलिसांनी अटक केली.

मोहम्मद हबीबूर रेहमान अन्वरअली प्रधानिया ऊर्फ शेख, फातिमा खातून मोहम्मद हबीबूर रेहमान अन्वरअली प्रधानिया ऊर्फ शेख, हबीबूर रेहमान प्रधानिया ऊर्फ शेख, अल्लाउद्दीन हबीबूर रेहमान प्रधानिया ऊर्फ शेख आणि सल्लाउद्दीन हबीबूर रेहमान प्रधानिया ऊर्फ शेख अशी या पाच जणांची नावे आहेत.

त्यांना अटक केल्यानंतर बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. हे बांगलादेशी कुटुंब कांदिवलीच्या इस्लाम कंपाऊंडमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या एटीएस पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे, अंमलदार शरद गावकर, शिवाजी नारनवर, सचिन दिसले, प्रशांत कुंभार, योगेश हिरेमठ, कपिला बेहूर चौकशी करून या कुटुंबाला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बांगलादेशातील उपासमारी आणि बेरोजगारीला कंटाळून ते पळून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT