मुंबई

टँकरच्या दरात ३०० रुपयांची वाढ

CD

खारघर, ता. २९ (बातमीदार) : सिडकोकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे टँकरची मागणी वाढली आहे. याचा फायदा घेत खासगी टँकरचालकांनी टँकरच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. खारघर वसाहतीत सिडकोकडून; तर तळोजा वसाहतीत सिडको आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडकोकडून कमी दाबाने आणि पुरेसा पाणीपुरवठा होत असल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. मागील वर्षी १,८०० ते १,९०० टँकरचा दर होता. यावर्षी त्यात तीनशे रुपयांनी वाढ केली आहे. याविषयी काही टँकरचालकांशी संपर्क केला असता, एमआयडीसीतून पाणी उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
---------
ज्या सोसायटीत पाण्याची समस्या आहे. अशा सोसायट्यांनी सिडकोकडून टँकर मागणी केल्यास टँकर उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे खासगी टँकरचालकांकडून जास्त पैसे देऊन पाणी घेणे टाळता येईल.
- बी. व्ही. गायकवाड, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग सिडको
------------
सिडकोकडून उडवाउडवीची उत्तरे
पाणी समस्येविषयी सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यास अनेक वेळा फोन उचलत नसल्याची तक्रार रहिवासी करत आहेत. तसेच फोन उचलल्यानंतर उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे सांगितले जात आहे. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, पाणी समस्येविषयी अनेकांचे फोन येतात. त्यामुळे अनेक वेळा फोन व्यस्त असतो. त्यामुळे नागरिकांबरोबर संपर्क कमी होत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

नवी मुंबईत ट्रॅफिकमुक्त प्रवासाचा मोठा निर्णय! तुर्भे उड्डाणपूल, डबल टनेल... वाहतूक कोंडीला ब्रेक लागणार

Bank Holiday Maharashtra: उद्या रामनवमी निमित्त बँका सुरू की बंद? जाणून घ्या RBI काय सांगते

Supreme Court of India: ॲट्रॉसिटीचे कवच सरसकट नाही; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

'ठरलं तर मग' मधून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट? अनेक दिवसांपासून मालिकेतून आहे गायब, म्हणाली- तिथे...

SCROLL FOR NEXT