मुंबई

विवा कट्ट्यावर जागवल्या गझलसम्राटांच्या आठवणी

CD

विरार, ता. २९ (बातमीदार) : ‘केव्हा तरी पहाटे’, ‘रंगुनी रंगात साऱ्या’ अशी एकापेक्षा एक गाण्याने सुरेश भट यांच्या गाण्याने विवा कट्टा चांगलाच रंगला. स्टार्स ट्रस्टच्या वतीने रविवारी (ता. २८) हुतात्मा स्मारक पापडी येथे विवा कट्ट्याचे ६६वे पुष्प गुंफले गेले. गझलसम्राट, ज्येष्ठ कवी, साहित्यिक सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गझला, कविता, किस्से व गीतांचे सादरीकरण कट्टेकरांनी केले. सुरेश भट यांच्या आठवणी सांगताना त्यांचे जीवनचरित्र, हृदयनाथ मंगेशकरांसोबतच्या आठवणी सांगत गीते, कविता व किस्से सादर करण्यात आले.

स्नेहल चौधरी (रंगुनी रंगात साऱ्या), शिल्पा पाटील (केव्हा तरी पहाटे), प्रनोती पाटील (गे मायभु तुझे), दिलीप राऊत (आताच अमृताची बरसात), मीना घरत (आज गोकुळात रंग), सुर्वे सर (सूर तुला मी मागू कसा), शामल पाटील (चल उठ रे मुकुंदा), मकरंद सावे (भोगले जे दुःख त्याला) या गाण्यांनी कार्यक्रमात रंग भरले. त्यानंतर भट यांचे किस्से व कविता यांनी रसिकांना खिळवून ठेवले. सुरेश भटांच्या शिष्या, गझलाकार ज्योती बालिगा राव यांनी त्यांच्या स्फूर्तीदायक, निश्चयी व मिश्किल स्वभावाची ओळख करुन देणारे, त्यांच्यासोबतचे अनेक खुमासदार किस्से सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. इंद्रजीत बंडोपाध्याय, प्रा. सोमनाथ विभुते, सखाराम भुमकर आदींनी त्यांच्या कवितांचे आवेशपूर्ण सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी २० मे रोजी सर्वांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करून अधिकार व कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT