मुंबई

बाळासाहेबांचे विचार शिल्लक सेनेने विकले

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : उद्धव ठाकरे यांनी हाताच्या पंजाला मतदान करणार असल्याचे जाहीर बोलले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही मोठी शोकांतिका असल्याचे म्हटले आहे. एक ठाकरे हे धनुष्यबाणाला, तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला मतदान करणार आहेत. इतकी वर्षे बाळासाहेब ठाकरे, सावरकर आणि हिंदुत्वाचे नाव घेऊन ज्यांनी राजकारण केले, त्यांचे विचार आज शिल्लक सेनेने आणि त्यांच्या प्रमुखाने विकले, अशी अप्रत्यक्षपणे शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विविध घटक पक्षांचे मेळावे घेत आहेत. महायुतीच्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या‍वेळी बोलताना त्यां‍नी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. बाळासाहेबांचे विचार विकण्याचे काम शिल्लक सेनेने आणि त्यांच्या प्रमुखांनी केले आहे. अनेक वर्षांपासून त्यांना जे हवे होते, ते त्यांनी त्या ठिकाणी केले आहे. त्यांना पहिल्यापासून काँग्रेसबरोबर जायचे होते. काँग्रेस सावरकरांना मानत नाही. सावरकरांना रोज शिव्या देतात. उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. जे हिंदुत्वाला विसरले, जे बाळासाहेबांच्या विचार विसरले, त्यांच्याकडून दुसरे काय अपेक्षा आहे. आम्हाला अभिमान आहे. हिंदुत्वाबरोबर उभे राहिलो. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर उभे राहिलो. आम्ही सावरकरांच्या विचारांवर उभे आहोत. धनुष्यबाण एकच सामान्य शिवसैनिकाच्या हातामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे, असा टोमणाही मारला.

डोंबिवलीत मनसेचा मेळावा
डोंबिवलीमध्ये १ तारखेला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मी उपस्थित राहणार आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरेंच्या येण्यामुळे महायुतीची ताकद अजून वाढली आहे. त्यांची सभा कल्याण लोकसभा मतदारसंघात झाली, तर आम्हाला आनंदच असल्याचे वक्तव्य श्रीकांत शिंदे काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT