मुंबई

नेरळमध्ये ओढे, नाल्‍यात कचऱ्याची रास

CD

नेरळमध्ये ओढे, नाल्‍यात कचऱ्याची रास
परिसरात दुर्गंधी, नालेसफाई अभियान राबविण्याची मागणी
नेरळ, ता. २९ (बातमीदार) : नेरळ शहरात अनेक ओढे, नाले असून सध्या ते कचऱ्याने बुजले असल्याचे चित्र आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्‍यामुळे नाल्या, ओढ्यांची सफाई कधी होणार, असा सवाल नेरळवासीयांकडून केला जात आहे.
पावसाळ्यापूर्वी स्थानिक प्रशासनाकडून नालेसफाईला सुरुवात केली जाते. जेणेकरून कचऱ्यामुळे ओढ, नाले तुंबून पाणी शहरात शिरू नये, यासाठी खबरदारी घेतली जाते. मात्र, नेरळ शहरातील नाले, ओढे कचऱ्यांनी तुडुंब भरलेले आहेत. अद्यापही पालिका प्रशासनाकडून सफाई करण्यात आलेली नाही. येथील मोहचीवाडी, वाल्मिकीनगर भागात कर्जत- कल्याण राज्यमार्गावर दोन पूल आहेत. या पुलाखालून जाणाऱ्या ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. अनेक दिवस कचरा पडून असल्‍याने तो कुजला आहे. त्‍यामुळे कुजलेल्‍या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाशांना तसेच वाहनचालकांना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नाले, ओढे यांची नेरळ ग्रामपंचायतीने तत्काळ स्वच्छता करावी, अशी मागणी नेरळवासीयांकडून करण्यात येत आहे. दरम्‍यान, पाऊस आला तर हाच कचरा पाण्यासोबत उल्हास नदीत जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तर शहरातील अनेक भागात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याने स्थानिक प्रशासन लक्ष देणार तरी कधी, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आर्थिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्‍हणून नेरळकडे पाहिले जाते. त्‍यामुळे ग्रामपंचायत प्रशासन येथील नागरी समस्या सोडवण्यात कमी पडत आहे, अशी टीका करण्यात येत आहे.
....................................
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वाल्मिकीनगर, मोहचीवाडी, पोलिस स्टेशन, स्मशानभूमी येथे असलेल्या पुलाजवळ कायम कचरा पडतो. नेरळमध्ये घनकचरा प्रकल्प प्रशासनाने करोडो रुपये खर्चून केला आहे. तरी हा कचरा पडण्यामागे कारण काय? त्याच्‍यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्‍यामुळे प्रशासनाने तत्काळ नालेसफाई अभियान राबविले पाहिजे. अन्यथा, नागरिक ग्रामपंचायतीला घेराव घालतील.
- गोरख शेप, स्‍थानिक रहिवासी
.........................
शहरातील नालेसफाई नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येते. पुढील १५ दिवसांत नालेसफाई करण्यात येईल.
- अरुण कारले, ग्रामसेवक, नेरळ ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT