मुंबई

महापालिका मुख्यालयातील वातानुकूलित यंत्रणा ठप्प

CD

महापालिका मुख्यालयातील वातानुकूलित यंत्रणा ठप्प
अधिकारी- कर्मचारी बेहाल; पंधरा दिवसांपासून दुरुस्‍तीचे काम सुरू
वाशी, ता. २९ (बातमीदार) : बेलापूर येथील नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मागील पंधरा दिवसांपासून वातानुकूलित यंत्रणा बंद असल्‍याने उकाड्यामुळे अधिकारी- कर्मचारी बेहाल झाले आहेत. तर काही अधिकाऱ्यांच्‍या दालनामध्ये गरमीमुळे पंखे लावून बसण्याची वेळ आली आहे. यामुळे कर्मचारी- अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय ग्रीन इमारत म्हणून ओळखली जाते. ही इमारत पूर्णता वातानुकूलित आहे. जवळपास या इमारतीसाठी ८०० टनांचे दोन वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून यामधील एका मशीनमध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे फक्त एकाच मशीनवर इमारतीचे वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्‍न केला जात आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून पारा चाळिशी पार गेला आहे. त्‍यामुळे ही इमारत पूर्णपणे थंड होत नसल्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांना उकाड्यामध्ये काम करावे लागत आहे. दहा वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या या मशीन नादुरुस्त झाल्यामुळे ऐन उन्‍हाळ्यात अधिकारी- कर्मचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे. तर वातानुकूलित यंत्रणा विदेशी असल्‍याने तिच्‍या दुरुस्‍तीसाठी वेळ लागत असल्‍याचे सांगण्यात येत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत काम पूर्ण होईल, असा विश्वास अंभियता विभागाकडून व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT