मुंबई

लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ ः लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे एका २६ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला आहे. रिया राजगोर असे मृत तरुणीचे नाव आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद झाली आहे.

डोंबिवली पूर्वेला राहणारी रिया ही ठाणे येथे कामाला होती. नेहमीप्रमाणे तिने डोंबिवली रेल्वेस्थानकातून मुंबई दिशेला जाणारी जलद लोकल पकडली होती. लोकलमध्ये गर्दी असल्याने दरवाजाजवळ ती उभी होती. रेटारेटीमुळे कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान रियाचा तोल जाऊन ती रुळांवर पडली. सोमवारी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान हा अपघात घडला असून डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना घटनास्थळी रियाचा मृतदेह सापडला आहे.
----------------------------------
आठवडाभरातील दुसरी घटना
डोंबिवलीतील प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू होण्याची आठवडाभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी अवधेश दुबे याचाही २३ एप्रिलला लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन डोंबिवली ते मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ; २ लाखांचे थकीत पीककर्जाचीच माफी, अशी नसणार अट; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा...

Quick & Easy Morning Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने ; फक्त 10 मिनिटांत बनवा 'मल्टी व्हिटामिन भेळ'

Panchang Today 30 Marach 2026 : आजचा दिवस शुभ; मुहूर्त, राहू काळ आणि उपाय जाणून घ्या

गुन्हेगारांचे धाबे दणाणले! सोलापूर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक; जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक, ऑर्केस्ट्रा बार, अवैध दारुनिर्मिती, विक्रीवर असणार लक्ष

MI vs KKR Live : रायन रिकल्टनच्या ८१ धावा, रोहित शर्माच्या ७८... तरीही प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार तिसऱ्यालाच; जाणून घ्या का?

SCROLL FOR NEXT