मुंबई

अभिजात मराठी भाषा पाठपुरावा समितीची दुसरी बैठक

CD

केंद्र व राज्यात मराठी भाषेसाठी एकाच वेळी पाठपुरावा
अभिजात मराठी भाषा पाठपुरावा समितीचा दुसऱ्या बैठकीत निर्णय


पुणे, ता. २९ : अभिजात मराठी भाषा पाठपुरावा समितीची सोमवारी (ता. २९) दुसरी बैठक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, सदस्य डॉ. सदानंद मोरे, डॉ. राजा दीक्षित, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, संजय नहार, सचिव डॉ. शामकांत देवरे आदी उपस्थित होते.

समितीच्या या बैठकीत आतापर्यंत झालेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या सचिवांशी व साहित्य अकादमीशी समितीच्या अध्यक्षांनी त्वरित संपर्क करावा, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. दिल्लीत संबंधित सांस्कृतिक मंत्री आणि सचिव यांच्याबरोबर समितीने जूनमध्ये बैठक घेण्याचे ठरविण्यात आले असून विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी या मागणीचा पाठपुरावा शासकीय पातळीवर पत्राद्वारे, त्याचप्रमाणे सामाजिक पातळीवर करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य अशा दोन्ही ठिकाणी पाठपुरावा केल्याने समस्येबाबत अधिक वेगाने वाटचाल होऊ शकेल, असा चर्चाही समितीच्या या बैठकीत झाली. दरम्यान, अभिजात भाषा पाठपुरावा समिती यांच्या मार्गदर्शनाने केंद्रातील सांस्कृतिक कार्य विभागाशी अभिजात भाषेच्या मागणीसंदर्भात लवकरच पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी दिली.

..
मराठी भाषा अभिजात भाषेच्या सर्व अटी पूर्ण करते. १२ कोटींच्या महाराष्ट्राची एकमुखी मागणी आहे. सर्व पक्षांचा याला पाठिंबा आहे. सर्वांच्या प्रयत्नाने हे कार्य यशस्वी करणार आहोत.
- ज्ञानेश्वर मुळे, अध्यक्ष, अभिजात भाषा पाठपुरावा समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT