Thane News sakal
मुंबई

Thane News: वाढत्या तापमानाचा ठाणेकरांना फटका; १९ जण बाधित

ठाणे पालिकेच्या कौसा प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक १७ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली |Health department informed that maximum 17 patients were treated at Kausa Primary Health Center of Thane Municipality

सकाळ वृत्तसेवा

Thane News: दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे उष्माघाताचा नागरिकांना त्रास होत आहे. ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी येथील सरकारी रुग्णालयात १९ जणांनी वाढत्या तापमानाची बाधा झाली असून यामध्ये सर्वाधिक १७ रुग्ण हे ठाणे पालिका क्षेत्रातील आहेत.


वातावरणातील बदलामुळे सर्वत्र उष्णतेत वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यासह शहरासह गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा ३५ ते ४० अंश सेल्सिअसवर गेला आहे. शहरात सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने नागरिकांना त्रास जाणवत आहे.

ठाणे पालिकेच्या कौसा आणि भिवंडीच्या आझमीन नगर येथील आरोग्य केंद्रात, मीरा-भाईंदर येथील भारतरत्न इंदिरा गांधी हॉस्पिटल येथे बाह्यरुग्ण विभागात १९ रुग्णांवर उष्माघातामुळे उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे पालिकेच्या कौसा प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक १७ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

तापमानाचा पारा चढाच
वाढताच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, याविषयी जिल्हा आरोग्य विभागासह जिल्ह्यातील विविध पालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. सध्यातरी शहरातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले असून मे मध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 1st Test: भारताची प्लेइंग इलेव्हन ठरवताना 'या' गोष्टीमुळे कन्फुजन, कर्णधार शुभमन गिलने स्पष्टच सांगितलं

"संजय दत्त हा देशद्रोहीच" प्रसिद्ध शेफने अभिनेत्यावर केले आरोप ; "आईचा मृतदेह म्हणून शरीराचा कोळसा.."

Latest Marathi Breaking News Live : नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार सज्ज! पाचपट भाविकांची अपेक्षा, २० हजार कोटींची कामे सुरु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nashik Leopard Attack : दोन बालकांचे बळी घेतल्यानंतर लष्कर खडबडून जागे; बिबट्यांना रोखण्यासाठी संरक्षण भिंत दुरुस्ती व दिवे लावण्याचे काम सुरू

Syncope Symptoms: अभिनेता गोविंदाला झालेला सिंकोपी आजार नेमका काय? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

SCROLL FOR NEXT