Crime News sakal
मुंबई

Crime News: मालवणी विषारी दारूकांडप्रकरणी चौघे दोषी; न्यायालयाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: मालाड-मालवणी येथे आठ वर्षांपूर्वी घडलेल्या विषारी दारूकांड खटल्याचा निकाल आज (ता. २९) सत्र न्यायालयाने जाहीर केला.

या हत्याकांडप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्या. स्वप्नील तवशिकर यांनी चौघांना दोषी ठरवून दहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. राजू तापकर, डोनाल्ड पटेल, फ्रान्सिस डिमेलो आणि मन्सूर खान अशी दोषी ठरवलेल्या आरोपींची नावे आहेत.

मालाड-मालवणी परिसरातील लक्ष्मीनगर झोपडपट्टीत जून २०१५ मध्ये विषारी दारूमुळे १०६ जणांचा बळी गेला होता. विषारी दारूप्रकरणी दारूअड्ड्याचा प्रमुख राजू लंगडा याच्यासह एकूण १४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून अटक करण्यात आली होती.

हा खटला रेंगाळल्याने उच्च न्यायालयाने हा खटला जलदगतीने चालवण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले होते. त्यानुसार सत्र न्यायालयात यावर सुनावणी घेण्यात आली. शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली, तर आरोपींनी सुटकेची विनंती न्यायालयाकडे केली होती. दरम्यान, आरोपी गीता सय्यद हिच्या वतीने ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात तिच्यासह दहा जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT