मुंबई

मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही झळ

CD

मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही झळ
कुर्ला स्थानकात प्रचंड गर्दी; रिक्षा-टॅक्सीकडून प्रवाशांची लूट
मुंबई, ता. २९ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाजवळ लोकलचा एक डबा रेल्वे रुळांवरून घसरल्याचा फटका मध्य रेल्वेच्या लोकल सेवेलाही बसला. सीएसएमटी ते वडाळा अप मार्गावरील लोकल एकामागे एक खोळंबल्या होत्या. त्यामुळे तीन-चार लोकल मशीद बंदर स्थानकाच्या मुख्य मार्गावरून सीएसएमटीकडे आणण्यात आल्या. त्याचा फटका मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर दिसून आला. दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी याचा फायदा उचलून प्रवाशांची लूट केली.

हार्बर मार्गावर लोकल सेवा तीन तास ठप्प असल्याने अनेक प्रवाशांनी सीएसएमटी गाठण्यासाठी कुर्ला स्थानकावर धाव घेतली होती. त्यामुळे कुर्ला रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. लोकल अपघातानंतर ठिकठिकाणी अडकलेल्या प्रवाशांनी टॅक्सी आणि रिक्षाचा आधार घेऊन नजीकचे स्थानक गाठत असल्याचे चित्र दिसून आले. चेंबूर, कॉटनग्रीन, जीटीबी, चुनाभट्टी, वडाळा रोड, रे रोड, डॉकीयार्ड स्थानकांबाहेर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. त्याचा फायदा घेऊन रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांची लूट केल्याचे प्रवाशांनी सांगितले.
...
चौकशीचे आदेश
या घटनेनंतर मध्य रेल्वेने तत्काळ चौकशी समितीची स्थापना करून चौकशीचे आदेश दिले. अपघातग्रस्त लोकल ट्रेनच्या मोटरमन आणि गार्डचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. ही घटना रेल्वे रुळाच्या पॉइंट फेलमुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे; परंतु हा अपघात नेमका कसा घडला, हे चौकशी समितीचा अहवाल आल्यावर सांगणे शक्य होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.
...
प्रवाशांना इजा नाही
अपघातग्रस्त लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांना जोरदार झटका बसला. त्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. चालकाने नियंत्रण मिळवत लोकल ट्रेन थांबवण्यात यश मिळवले. लोकल थांबताच प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या घेतल्या. रेल्वे रुळावरून चालत सीएसएमटी स्थानक गाठले. या घटनेत कुठल्याही प्रवाशाला इजा झाली नसल्याची माहिती अपघातग्रस्त लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT