Mumbai Loksabha sakal
मुंबई

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाड यांच्याविरोधात पेल्यातले वादळ; निवडणूक होणार कठीण

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याविरोधातील नाराजी अजूनपर्यंत दूर झाली नसल्याचे चित्र आहे.

वर्षा गायकवाड यांच्या पक्षांतर्गत विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अमरजितसिंह मनहास उपस्थित होते. हे नेते नाराज असले तरी केवळ उपद्रवमूल्य आणि आपले अस्तित्व दाखवून देण्याचा हा प्रकार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हे पेल्यातले वादळ ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बीकेसी परिसरातील एमसीए क्लब येथे मुंबईतील पाच काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून नाराजीचा सूर होता. मात्र, प्रत्यक्षात नसीम खान यांचा संताप शांत करण्यासाठी आम्ही आलो होतो, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांनी दिले. मुस्लिमबहुल असलेल्या उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशा नसीम खान यांना होती. मात्र, प्रत्यक्षात वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नसीम खान यांच्यासह माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार भाई जगताप हेदेखील नाराज आहेत. त्यामुळेच नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला.

नाराजी कायम


महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे नसीम खान यांची नाराजी स्वाभाविक आहे. मात्र, त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. अजूनही उत्तर मुंबई जागेच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते. असे या बैठकीत सहभागी झालेल्या एका नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

काँग्रेस हायकमांड एकदा निर्णय घेतल्यानंतर निर्णय मागे घेत नाही, अशी आठवणही या नेत्याने करून दिली. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ज्या प्रकारे मुस्लिम समाज काँग्रेसच्या मागे एकवटा आहे. ते बघता नसीम खान यांची नाराजी फार काळ टिकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
....
वर्षा गायकवाड मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र नसीम खान गैरहजर राहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. काँग्रेस नेतृत्व त्यांच्याशी संपर्कात आहे. त्यातून तोडगा निघेल. नसीम खान यांच्यावर अजून मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.
....
मुंबईतील आम्ही सर्व काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
- चंद्रकांत हांडोरे, काँग्रेस नेते
...
नसीम खान हे निष्ठावंत काँग्रेस नेते आहेत. लवकरच ते प्रचारात सक्रिय होतील.
- अमरजितसिंह मनहास, काँग्रेस नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT