मुंबई

कबड्डी सराव शिबिर

CD

कबड्डी सराव शिबिर
घाटकोपर, ता. ३० (बातमीदार) : मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने किशोर गट मुलांचे पूर्व विभागाचे २८ एप्रिल ते २ मे २०२४ या कालावधीत सायंकाळी साडे सहा ते नऊ वाजेपर्यंत पाच दिवसांच्या सराव शिबिराचे आयोजन केले आहे. मानेकलाल मैदान, घाटकोपर पश्चिम येथे हे सराव शिबिर पार पडत आहे. या शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू, छत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या शिबिरात मुंबई उपनगर जिल्ह्यातील पूर्व विभागातील १५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. किरण देवाडीका, रिबेका गवारे, वीणा खवळे, अमित ताम्हाणेकर, जिग्नेश मोरे, सतीश चव्हाण, पुनीत पुजारी, सुनील खोपकर, राजेश तुळसकर, विकास उतेकर, हेमंत तोडणकर, संदीप येवले हे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. सराव शिबिरात खेळाडूंना अल्‍पोपाहार, दूध, अंडी, पोहे देण्यात येत आहेत. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह राजेश पडेलकर, कोषाध्यक्ष मिथुन शार्दल यांनी शिबिरास उपस्थित राहून खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT