मुंबई

टोलमुक्‍तीची मुलुंड पूर्वेतील रहिवाशांची मागणी

CD

टोलमुक्‍तीची मुलुंड पूर्वेतील रहिवाशांची मागणी
‘नोटा’चे बटन दाबण्याचा इशारा
मुलुंड, ता. ३० (बातमीदार) : मुलुंड पूर्वेतील हरिओमनगर येथील गृहनिर्माण संस्थेमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी टोलमाफीसाठी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, ही मागणी पूर्ण होत नसल्‍याने रहिवासी आक्रमक झाले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ‘नोटा’चे बटन दाबण्याचा इशारा त्‍यांनी दिला आहे.
या प्रश्‍नांसंदर्भात नुकतीच रहिवाशांची एक बैठक पार पडली. तांत्रिकदृष्ट्या हा परिसर मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो; परंतु मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघात मतदार असलेल्या २६ गृहनिर्माण संस्थांची वसाहत भौगोलिकदृष्ट्या ठाण्यात आहे. या गृहसंकुलात तब्बल १० हजार रहिवासी राहतात. मुंबईतून बाहेर पडताना आणि प्रवेशाचे ठिकाण ओलांडताना संपूर्ण टोलमाफीची मागणी हे रहिवासी अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र, निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय निवडू नये, अशी भूमिका हरिओमनगर एपेक्स बॉडी फेडरेशन (होनाफे)चे अध्यक्ष साहेबराव सुरवाडे यांनी घेतली आहे.
हा मुद्दा राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे टोलमाफीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती ‘होनाफे’चे अध्यक्ष साहेबराव सुरवाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT