मुंबई

कोकण विभागीय महसूल आयुक्तपदी पी. वेलरासू

CD

नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची मुंबईत एसआरए विभागात बदली झाल्याने त्यांच्या जागी मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ३०) वेलरासू यांनी कोकण विभागीय महसूल आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी त्यांनी कोकण विभागीय कार्यालयासह महसूलच्या विविध विभागांची पाहणी केली. तसेच कोकण भवनमधील महत्त्वाच्या विभागांच्या विभागप्रमुखांशी चर्चा केली.
कोकण विभागात विकासाच्या दृष्टीने काम करण्यास भरपूर संधी आहे. कोकणातील नागरिकांना महसूल विभागातर्फे सुलभ सेवा देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. कोकण विभागातील अनुभवी अष्टपैलू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नागरिकांना सेवा पुरवण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित आयुक्त पी. वेलरासू यांनी या वेळी सांगितले. वेलरासू हे २००२च्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक व ठाणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. पी. वेलरासू यांचे मास्टर्स इन पब्लिक अफेअर, पब्लिक पॉलिसी ॲनॅलिसीसचे शिक्षण कॅलिफोर्निया विद्यापीठातून झाले आहे. त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT