मुंबई

दहा लाख रुपयांपर्यंत जप्त रक्कम प्रकरणी त्रिसदस्यीय समिती

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर निवडणूक आयोगाकडून देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात नियुक्त केलेल्या विविध पथकांकडून व पोलिस पथकांनी केलेल्या कार्यवाहीमध्ये १० लाख रुपयांपर्यंतची प्रकरणे जलद गतीने सोडवण्यासाठी व याबाबत निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी त्रिसदस्यीय रोख रक्कम सोडवणूक समिती (कॅश रिलीज कमिटी) गठित केली आहे. या रकमेच्या मर्यादेत जप्त केलेल्या प्रकरणांमध्ये संबंधितांना या समितीकडे दाद मागता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खर्च नियंत्रण विषयांतर्गत रोख रक्कम सोडवणूककरिता ही समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये सहआयुक्त अंबरनाथ खुले हे अध्यक्ष तर सहायक आयुक्त विश्वास मोटे आणि अधिदान व लेखाधिकारी विलास गांगुर्डे हे सदस्य असणार आहेत. तर त्रिसदस्यीय समितीचे कार्यालय हे महसूल भवन सभागृह, गुरुनानक रुग्णालयाच्या पाठीमागे, वांद्रे (पूर्व) येथे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT