मुंबई

मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

CD

मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे
यंदाच्या पावसाळ्यात ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा २२ वेळा उसळण्याची शक्यता आपत्कालीन विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे हे दिवस धोक्याचे असून मोठ्या भरतीच्या दिवसांत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यंदाचा पावसाळा लवकर सुरू होईल, असे संकेत हवामान खात्याकडून मिळत आहेत.
पावसाळ्यात जून महिन्यातील सात दिवस, जुलै महिन्यातील चार दिवस, ऑगस्ट महिन्यातील पाच दिवस, तर सप्टेंबर महिन्यातील सहा दिवस धोक्याचे आहेत. यापैकी सर्वाधिक उंच लाटा या २० सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून तीन मिनिटांनी उसळणार असून या लाटांची उंची ४.८४ मीटर इतकी असे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली आहे. मोठ्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
...
भरतीच्या मोठ्या लाटा कधी?
वार तारीख- वेळ- उंची (मीटरमध्ये)
जून
बुधवार ५ - सकाळी ११.१७ वा. ४.६१
गुरुवार ६ - दुपारी १२.०५ वा. ४.६९
शुक्रवार ७ - दुपारी १२.५० वा. ४.६७
शनिवार ८ - दुपारी ०१.३४ वा. ४.५८
रविवार २३ - दुपारी ०१.०९ वा. ४.५१
सोमवार २४ - दुपारी ०१.५३ वा. ४.५४
मंगळवार २५ - दुपारी ०२.३६ वा. ४.५३
...
जुलै
सोमवार २२ - दुपारी १२.५० वा. ४.५९
मंगळवार २३ - दुपारी १.२९ वा. ४.६९
बुधवार २४ - दुपारी २.११ वा. ४.७२
गुरुवार २५ - दुपारी २.५१ वा. ४.६४
...
ऑगस्ट
सोमवार १९ - सकाळी ११.४५ वा. ४.५१
मंगळवार २० - दुपारी १२.२२ वा. ४.७०
बुधवार २१ - दुपारी १२.५७ वा. ४.८१
गुरुवार २२ - दुपारी १.३५ वा. ४.८०
शुक्रवार २३ - दुपारी २.१५ वा. ४.६५
...
सप्टेंबर
मंगळवार १७ - सकाळी ११.१४ वा. ४.५४
बुधवार १८ - सकाळी ११.५० वा. ४.७२
गुरुवार १९ - मध्यरात्री ००.१९ वा. ४.६९, दुपारी १२.२४ वा. ४.७८
शुक्रवार २० - मध्यरात्री १.०३ वा. ४.८४, दुपारी १.०२ वा. ४.७०
शनिवार २१ - मध्यरात्री १.४७ वा. ४.८२, दुपारी १.४२ वा. ४.५०
रविवार २२ - मध्यरात्री २.३३ वा. ४.६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT