मुंबई

तृतीयपंथींकडून मतदान करण्याचे आवाहन

CD

तृतीयपंथींकडून मतदान करण्याचे आवाहन
भिवंडी, ता. २ (बातमीदार) : भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक स्वीप कार्यक्रम मतदार जनजागृती अभियान सुरू आहे. तृतीयपंथी मतदार, वारांगना यांच्यात मतदान जनजागृती होणे आवश्यक आहे, यासाठी निवडणूक आयोग प्रचार व प्रसार करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तृतीयपंथी आणि वारांगना मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. मतदान जागृती आणि मतदान करणे या प्रचाराचा एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या संचालक दीपाली मासिरकर, वरिष्ठ सल्लागार साधना राऊत आणि कक्ष अधिकारी उदिता कांडपाल; तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयातील पल्लवी जोशी यांनी शहरातील लाहोटी कंपाऊंडमधील अस्मिता फाऊंडेशन येथे तृतीयपंथी मतदार नोंदणी, तसेच वारांगनांसाठी मतदान जनजागृतीसाठी भेट दिली. याप्रसंगी भिवंडी पूर्व मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप, भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे; तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार मोहिते, नायब तहसीलदार यादव, पालिका उपायुक्त प्रणाली घोंगे, उपायुक्त अजय एडके, भिवंडी महापालिका निवडणूक प्रमुख नितीन पाटील, तसेच दोन्ही मतदारसंघांचे स्वीप पथकाचे अधिकारी, सदस्य उपस्थित होते.

भिवंडी मतदारसंघातून १०२ नामनिर्देशन अर्जांची विक्री
भिवंडी, ता. २ (बातमीदार) : भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी विविध पक्ष-संघटना आणि अपक्ष उमेदवारांनी मिळून मंगळवार (ता. ३०)पर्यंत नामनिर्देशन अर्ज विकत नेल्याची संख्या १०२ झाली आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज रोजी भिवंडीच्या लोकसभा निवडणूक कार्यालयातून आज रोजी आझाद समाज पार्टी-०२, भारत राष्ट्र समिती-०२, आईएमआय-०४, अपक्ष-०४, बहुजन समाज पार्टी-०१, बहुजन मुक्ति पार्टी-०३, भाजप-०४ असे एकूण २० नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे. आजपर्यंत या कार्यालयातून विक्री झालेल्या अर्जांची संख्या १०२ झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT