मुंबई

भाजप २८ तर शिवसेना शिंदेगट १५

CD

ठाणे नाशिक सेनेकडे, भाजप लढणार पालघर?
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता.३० ः कित्येक दिवस रखडलेले महायुतीचे जागावाटप अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. ठाणे आणि नाशिक हे दोन मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे तर पालघर मतदारसंघ भाजपकडे येण्याची शक्यता आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपने अद्याप दावा सोडलेला नाही. संजीव नाईक यांचे नाव चर्चेत आहे. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्याशी रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू ठेवली होती. नाशिक मतदारसंघात हेमंत गोडसे यांनाच संधी द्यावी असे सुरू आहे. पालघर मतदारसंघ भाजपकडे येण्याची शक्यता असून तेथे राजेंद्र गावित किंवा प्रकाश निकम यांना उमेदवारी दिली जाईल असे समजते. ऐनवेळी बहुजन विकास आघाडीचा उमेदवार भाजपतर्फे रिंगणात उतरेल. आज सुरू असलेल्या चर्चा प्रत्यक्षात आल्या तर भाजप २८, शिवसेना १५ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा ४ आणि रासप १ जागा लढेल.

भाजप अद्याप आशावादी
भाजपने अजूनही ठाणे मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. ही जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेळप्रसंगी संजीव नाईक यांनी धनुष्यबाणावर लढावे, अशी रचना प्रत्यक्षात येण्याचीही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT