मुंबई

टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती

CD

टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती
बाळासह महिलेचा मृत्यू; कुटुंबीयांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : भांडुप येथील कुकरेजा कॉम्प्लेक्स परिसरातील सुषमा स्वराज या पालिका प्रसूतिगृहामध्ये प्रसूतीदरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडित झाला आणि डॉक्टरांवर टॉर्चच्या प्रकाशात गर्भवती महिलांची प्रसूती करण्याची वेळ आली. प्रसूतीनंतर नवजात शिशूचा मृत्यू झाला, तर गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचादेखील मृत्यू झाला. संतप्त नातेवाइकांनी हलगर्जी केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत रुग्णालय परिसरात गोंधळ घातला.
या प्रसूतिगृहात अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वीही झाल्या आहेत. दरवेळी पालिका प्रशासन अधिष्ठाता आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात, असा आरोप माजी नगरसेविका जागृती पाटील यांनी केला आहे. या भागात अनेक गरीब लोक आहेत. त्यांच्या असाहाय्यतेचा फायदा घेतला जातोय, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. ही घटना सोमवार मध्यरात्रीची असून दोन ते तीन वेळा रुग्णालयाची लाईट गेल्याचे सांगण्यात येते. टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती करण्याच्या प्रयत्नादरम्यान नवजात बाळ मरण पावले. आईची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, सकाळी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत गोंधळ घातला. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावावा लागला. माजी नगसेविका जागृती पाटील यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. दरम्यान, मृत महिलेचे नाव सैदुन अन्सारी (वय २६) होते. मृतदेहावर दफनविधी करण्यात आले.
...
रुग्णालयातील विद्युत पुरवठा प्रसूतीनंतर खंडित झाला. कुटुंबीयांकडून होणारे आरोप चुकीचे आहेत. आम्ही याबाबत समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका
...

या रुग्णालयात वारंवार अशा घटना घडतात; मात्र जबाबदार डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जाते. हा प्रकार बंद झाला पाहिजे. दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे.
- जागृती पाटील, माजी नगरसेविका
...
आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्हाला न्याय पाहिजे. आमच्यावर जो अन्याय झाला आहे तसा अन्य कोणावर होऊ नये. यात डॉक्टर, अधिष्ठाता व कर्मचारी दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी आम्हाला कोणतीही मदत केली नाही.
- शाहरुख अन्सारी, मृत महिलेचा दीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

Numerology : कुटुंबासाठी काहीही करू शकतात 'या' 4 मुलांकाचे लोक, कुणी अपमान केल्यास बदला घेण्यासाठी करतात हद्द पार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT