मुंबई

रस्ते डांबरीकरणाची निविदा आचारसंहितेच्या कचाट्यात

CD

खारघर, ता. १ (बातमीदार) : खारघर वसाहतीमधील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडून काढण्यात आलेली निविदा निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्यामुळे यंदा खारघरवासीयांना खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागणार आहे.
खारघर वसाहतीमधील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बँक ऑफ इंडियाकडून घरकुल तसेच डेली बाजार आणि खारघर पोलिस ठाण्याकडून रॉयन इंटरनॅशनल स्कूलमार्गे खारघर गावाकडे जाणारा रस्ता तसेच शिल्प चौकाकडून सेक्टर सातकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अशीच अवस्था सेक्टर २९मधील आहे. ग्रामविकास भवनकडून महावीर हेरिटेजकडे जाणाऱ्या आणि महावीर हेरिटेजकडून शिल्प चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची आणि सेक्टर २०मधून सेक्टर १२ मधील पेट्रोलपंपामार्गे प्राईम मॉलकडे आणि प्रणाम हॉटेलकडून दत्त मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खारघर वसाहतीमधील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी पालिकेकडून काढण्यात आलेली निविदा निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्यामुळे जून महिन्यात एजन्सीला परवानगी दिली जाणार आहे. मात्र, जून महिन्यात पावसाळा सुरू होतो. त्यामुळे खारघरवासीयांना पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यावरून मार्ग काढावा लागणार आहे.

---------
चांगल्या रस्त्यांचे खोदकाम करून डांबरीकरण
मागील वर्षी सिडकोने रांजणपाडा गावाकडून वास्तुविहार सेलिब्रेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. विशेष म्हणजे, हे रस्ते चांगल्या अवस्थेत असताना रस्त्याचे खोदकाम करून काही ठिकाणी डांबरीकरण; तर काही ठिकाणी काँक्रीटीकरण केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ज्या रस्त्यावर वर्दळ नसते, अशा रस्त्याचे काम करून पालिका जनतेच्या पैशांचा दुरुपयोग करीत आहे. खारघरच्या अंतर्गत रस्त्यांऐवजी प्रथम वर्दळ नसलेल्या रस्त्याचे काम केले जात असल्यामुळे नागरिक आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.

----------
खारघर वसाहतीमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली आहे. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे वर्कऑर्डर देता येत नसल्यामुळे पालिकेकडून खारघर वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी पालिकेकडून घेतली जात आहे.
- संजय कटेकर, कार्यकारी अभियंता, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT