मुंबई

गल्लोगल्ली निवडणुकीच्‍या रंगल्या गप्पा

CD

गल्लोगल्ली निवडणुकीच्‍या रंगल्या गप्पा
पनवेल, ता. १ (बातमीदार) : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असून मतदारांच्‍या गप्पा रंगू लागल्‍या आहेत. कोण उमदेवार निवडून येणार, याचे भाकीत जो-तो आपापल्‍यापरिने मांडू लागला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीचा उत्साह सुरू झालेला आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघातही आता निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. शहरातील प्रचारफेरीचे एक वर्तुळही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केले आहे. शिवसेना उबाठा गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमध्ये प्रचारफेरी सुरू केली आहे. यासह इतर पक्षांच्या उमेदवारांचे कार्यकर्तेही प्रचार करत आहेत. त्‍यामुळे निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात निवडून कोण येणार? वाघिरे-पाटील येणार की आप्पा, अशी कुजबूज पनवेल शहरासह संपूर्ण मावळमध्ये सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT