मुंबई

वसईत आज सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

CD

विरार, ता. १ (बातमीदार) : विरार येथील श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट आणि चंडिका देवी मंदिर न्यास यांच्यातर्फे मंगळवारी (ता. २) सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जूचंद्र येथील चंडिका देवी मंदिराजवळ ५१ जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे, तर विरार येथील श्री जीवदानी देवी मंदिर येथे १८ विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी २६ फेब्रुवारीला जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट आणि सर्वदा प्रतिष्ठानच्या वतीने २५० जोडप्यांचे विवाह करण्यात आले असून उर्वरित १८ जोडप्यांचे विवाह मंगळवारी करण्यात येणार आहेत. या वेळी जोडप्यांना मंदिराकडून कपडे, संसारोपयोगी भांडी भेट म्हणून देणार असल्याचे जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी सांगितले. तर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर यांनी सांगितले की, मंदिर ट्रस्ट वर्षातून दोन वेळा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आले आहे. यापुढेही करत राहणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. चंडिका देवी न्यासाचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे १८ वे वर्ष आहे. या सोहळ्यांत विजय पाटील हे कन्यादान करत आले आहेत. त्यांच्याबरोबरच गावातील दानशूर विवाह सोहळ्याला सढळ हस्ते मदत करत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT