मुंबई

विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

CD

उरण, ता. १ (बातमीदार) : उरण परिसरात महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे व दुर्लक्षितपणामुळे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे घटना शनिवारी (ता. २७) दुपारी घडली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचे बेजबाबदार उपअभियंता राहुल शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. महावितरणच्या उरण कार्यालयात बोकरविडा येथील रवींद्र पाटील हे कंत्राटी पद्धतीने वायरमन म्हणून कार्यरत होते. ते शनिवारी मुळेखंड, तेळीपाडा परिसरात दुरुस्तीचे काम करण्यासाठी विद्युत खांबावर चढले होते. दरम्यान, त्यांना अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. विद्युत दुरुस्तीची कोणतीही कामे करीत असताना विद्युतपुरवठा खंडित करणे गरजेचे असते; मात्र उपअभियंता राहुल शिंदे यांनी हा विद्युत पुरवठा सुरू असताना रवींद्र पाटील यांना काम करण्यास कशी परवानगी दिली, असा सवाल उपस्थित नागरिकांतून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT