मुंबई

सिमेंटच्या ठाेकळ्यांचा वाहनचालकांना त्रास

CD

सिमेंटच्या ठोकळ्यांचा वाहनचालकांना त्रास
- कांदिवली पूर्वेत जीवघेणी प्रवास; अपघाताची भीती
कांदिवली, ता. १ (बातमीदार) : कांदिवली पूर्वेत एकमेव मुख्य मार्गावर दुभाजकांमध्ये लावण्यात येणारे सिमेंटचे ब्‍लॉक रस्‍त्‍यावर पडून असल्‍याने याचा वाहनचालकांना त्रास होत आहे. एखादा अपघात घडण्यापूर्वी हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
कांदिवली पूर्व रेल्‍वे स्‍थानकापासून दामूनगर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ भागाकडे जाणारा आकुर्ली हा एकमेव मुख्य अरुंद मार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. महिंद्रा कंपनी तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानासमोर दुभाजकासाठी हे सिमेंटचे ब्लॉक आणण्यात आले आहेत; परंतु काम झाल्‍यानंतर ब्‍लॉक उचलले जात नाहीत, असे वाहनचालकांचे म्‍हणणे आहे. या मार्गावर रिक्षा, टॅक्सी, बेस्ट बस, अवजड वाहनांची सातत्याने रेलचेल असते. रात्री अंधारात चुकून रिक्षाचा टायर ब्‍लॉकला घासला गेल्‍यास रिक्षा पलटी होऊन मोठी दुर्घटना घडू शकते.
अनेक ठिकाणी अशीच परिस्‍थिती आहे. पालिकेने विकासकामे करताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्‍यावी, अशी प्रतिक्रिया रिक्षाचालक अरविंद ढेरंगे यांनी दिली. रस्‍त्‍यावरील ब्‍लॉक तातडीने उचलण्यास सांगण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दुय्यम अभियंता राहुल पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: पॅट कमिन्सच्या जागेवर इशान किशन होणार SRH चा कर्णधार? काय आहेत नवे अपडेट्स?

'सनई चौघडे'चा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला की नाही? नेटकऱ्यांना आठवली 'ही' जुनी मालिका, म्हणतात- जोडी भारीये पण...

Latest Marathi News Live Update : युद्धाचा फटका सोलापुरात; प्रसिद्ध ‘प्रीती डायनिंग’मध्ये नाश्ता बंद

'Dhurandhar' चित्रपट पाहून अडचणीत सापडला वैभव सूर्यवंशी... म्हणाला, माझी फेव्हरिट मुव्ही... सोशल मीडियावर गदारोळ

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

SCROLL FOR NEXT