मुंबई

वांद्रे वसाहतीमधील कर्मचाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांना पुनर्विकास प्रकल्पातून माफक दरात मालकी तत्त्वावर हक्काचे घर मिळावे, म्हणून वारंवार पाठपुरावा सुरू आहे. यावर सरकारकडून केवळ सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे येथील कर्मचारी- अधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी असून त्यांना लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे गव्हर्नमेंट क्वाटर्स रेसिडेंट्स असोसिएशनकडून सांगण्यात आले.
शासकीय वसाहतीमध्ये गेल्या २५-३० वर्षांपासून अधिकारी- कर्मचारी वास्तव्याला आहेत. त्यामुळे या वसाहतीच्या पुनर्विकासात हक्काचे घर दिले जावे, अशी त्यांची मागणी आहे. सरकार मात्र त्याबाबत ठोस निर्णय घेत नाही. गिरणी कामगारांना, बीडीडी चाळकऱ्यांना, सफाई कामगारांना, इतर ठिकाणच्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार सवलतीच्या दरात घर उपलब्ध करून देत आहे. मात्र, वांद्रे वसाहतीमधील कामगारांना घरे देण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. त्या पार्श्वभूमीवर वसाहतीमधील रहिवाशांची बैठक झाली. त्यामध्ये लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT