मुंबई

देशीला विदेशीचा ‘दर्जा’ कागदावरच

CD

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : देशीमद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना जादाचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने काजूबोंडे, मोहफुलासह स्थानिक उत्पादित होणाऱ्या फळे व फुलांपासून तयार होण्याला मद्याला विदेशीचा दर्जा दिला होता. तसेच उत्पादन शुल्कातही भरघोस सूट देण्यात आली. मात्र, दोन वर्षांत चार उद्योजक समोर आल्याने देशी मद्याला विदेशीचा दर्जा कागदावरच आहे.
स्थानिक देशी निर्मितीला चालना देण्यासाठी २०२२ला हे धोरण लागू झाले होते. मात्र, दोन वर्षात केवळ नंदुरबार, गोंदिया जिल्हात प्रत्येकी एक तर गडचिरोली दोन असे चार मद्यनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी उद्योजक पुढे आले आहेत. या चारही प्रकल्पात मोहफुलांपासून मद्यनिर्मिती होणार आहे. मात्र, अजूनही काजूबोंडे, केळी, मोसंबी, संत्री, डाळिंब यांसारख्या फळ-फुलांमधून मद्यनिर्मिती करण्यास एकही उद्योजक तयार नसल्याचे चित्र आहे.
विदेशी मद्यनिर्मितीवर ३०० टक्के एवढे उत्पादन शुल्क लावले जाते. मात्र, फळ-फुलांपासून तयार होणाऱ्या देशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर केवळ ५० रुपये प्रतिलिटर एवढा आकारण्यात येत असूनही मद्यनिर्मिती प्रकल्प टाकण्यासाठी उद्योजक उत्साही नाहीत.
----------------------------------------------------
व्‍हीएसआयची मदत
राज्यात मोहफुले आणि काजूबोंडे यासोबत केळी, मोसंबी, संत्री, द्राक्षे, डाळिंब व अन्य फळे-फुले यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. फळे, फुले नाशवंत असतात, त्यामुळे बरेचसे फलोत्पादन वाया जाते. मात्र, नाशवंत फळे- फुले यांपासून मद्यनिर्मिती केल्यास शेतकऱ्यांना शेतीसोबत एक जोडधंदा मिळेल, उत्पन्न वाढेल. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्‍हीएसआय) मदत घेतली आहे. व्‍हीएसआय आता कुठल्या फळ-फुलातून मद्याची निर्मिती होऊन शकेल, हे शोधून काढणार आहे. भविष्यात त्यावरून मद्यनिर्मिती केली जाणार आहे.
--------------------------------
ग्राफिक्स
धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी
- २०२२ रोजी फळे-फुलांपासून मद्यनिर्मितीला मंजुरी
- फळे-फुलांपासून मद्याला विदेशी दर्जा
- उत्पादन शुल्कात घसघशीत सूट
- प्रकल्प टाकण्यासाठी एक खिडकी योजना
- शेतकऱ्यांना मिळणार जोडधंदा
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT