मुंबई

ठाण्यात शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ ः ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे आणि महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी महापौर नरेश म्हस्के असा थेट सामना होणार आहे. या लढाईत मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेले ठाणे, सत्ता, सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचे बळ नरेश म्हस्केंकडे आहे. तर दुसरीकडे दोनवेळचा खासदारकीचा अनुभव आणि केवळ निष्ठावंत सैनिक म्हणून ओळख अन् गाठीला मोजके पदाधिकारी विचारेंकडे आहेत. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला यावार शिवसेनेचे भवितव्य अवलंबून आहे.
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत दोन गट पडले. या राजकीय भुकंपाचे ठाणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिलेदार होते. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात ठाणे म्हणजे धगधगता निखारा ठरत आहे. शाखा ताब्यात घेण्यापासून ते सर्वाधिक माजी नगरसेवक, पदाधिकारी आपल्या बाजूने उभी करण्यात शिवसेना शिंदे गटाला यश आले आहे. तर ठाण्यातील दोन आमदार शिंदे गटात तर चार आमदार मित्रपक्ष भाजपचे असल्याने तुलनेने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. अशाच शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्याचा गड राखण्यासाठी एकमेव खासदार राजन विचारे लढत आहेत.
----------------------------
विजयाचे गणित ठरवणारे मुद्दे
राजन विचारे -
सामान्य कार्यकर्ता आणि जुन्या फळीतील शिवसैनिक राजन विचारे यांच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. यातही जागावाटपात मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने पूर्ण सहकार्य करण्याचे ठरवल्याने राजन विचारे यांची ताकद वाढली आहे. विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जमलेले शिवसैनिक आणि समर्थकांची गर्दी बरेच काही बोलत आहे. पण गर्दीचे रूपांतर मतदानात करण्यात कितपत यश येते, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
--------------------------
नरेश मस्के -
ठाण्याच्या जागेवरून भाजप, शिवसेना शिंदे गटात शेवटच्या घटकापर्यंत रस्सीखेच सुरू होती. शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी भाजप हा धक्का सहन करण्याच्या स्थितीत नाही. दुसरीकडे शिंदे गटातील इच्छुकांचाही हिरमोड झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजिब मुल्ला म्हस्के यांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांची साथ मिळेल पण आनंद परांजपे यांच्यात उघड वाद आहे.
-----------------------------------
दोन्ही उमेदवारांमधील साम्य
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले खासदार राजन विचारे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रवासात बरेच साम्य आहे. हे दोन्ही उमेदवार सामान्य शिवसैनिक म्हणून आधी उदयास आले. दोघेही आनंद दिघे यांचे शिष्य. नगरसेवक झाले. दोघांनीही महापालिकेत आधी सभागृह नेता आणि नंतर महापौर म्हणून कार्यकाळ चालवला. विरोधकांना अंगावर घेण्याची आणि प्रसंगी तडजोड घडवून आणण्याची कला दोघांमध्येही आहे. एक ठाकरेंचा निष्ठावंत तर दुसरा शिंदेचा निष्ठावंत म्हणून ओळखला जातो.
-----------------------------------------------
राजकीय बलाबल
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे, कोपरी- पाचपाखाडी, ओवळा-माजिवाडा, ऐरोली, बेलापूर आणि मीरा- भाईंदर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी कोपरी-पाचपाखाडी येथे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आहेत. ओवळा- माजिवाड्यात शिंदे गटाचे प्रताप सरनाईक आमदार आहेत. उर्वरित चार विधानसभा मतदारसंघात संजय केळकर, मंदा म्हात्रे, गीता जैन, गणेश नाईक हे भाजप आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे पारडे सध्यातरी जड वाटते. ठाण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठाही पणाला लागल्याने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT