मुंबई

कामगारा दिनादिवशीच अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

CD

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, एसएसजी इंजिनिअरिंगकडे केली मागणी
एकलहरे, ता. १ : राज्यात कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम सुरू असताना होत असलेल्या अन्यायाविरोधात एका कंत्राटी कामगाराने अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
एस.एस.जी. इंजिनिअरिंग अँड कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे कामगार भगवान पाटील कामाला होते. मागील पाच महिन्यांत तीन महिन्यांपासून ऑर्डर बंद होती. त्यानंतर ऑर्डर सुरू होऊन दोन महिने झाले तरी जाणीवपूर्वक कंत्राटी कामगारांना कामावर घेतले गेले नाही. त्यामुळे कंत्राटी कामगार विशाल अहिरे, भगवान पाटील यांनी अर्धनग्न अवस्थेत प्रशासनाविरोधात आंदोलन केले.
अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत कंत्राटी कामगारांना कामावर पूर्ववत करण्यात तसेच कामगारांचा पूर्णपणे २५ टक्के दरमहा पीएफ भरण्यात यावा, ईएसआयसी कार्ड करण्यात यावे व पगारसुद्धा १० तारखेच्या आत कंत्राटी कामगारांना देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच कंत्राटी कामगारांना कामावरून काढले जात असल्याने त्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले व कंत्राटी कामगारांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Raj Thackeray : लोकसभेनंतर 6 महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार कसे वाढले? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील 'एसआयआर' रद्द करण्यावरही भाष्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील एसआयआर पूर्णपणे रद्द करावा आणि यापुढे मतदान बॅलेट पेपरवर घ्या - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT