मुंबई

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेसह हॉटेल व्यवस्थापकाला अटक

CD

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दिघा विष्णू नगर येथील एकता हॉटेल ब्रिस्टो फुड बारवर शनिवारी (ता. २९) दुपारी छापा मारत या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिला दलाल तसेच हॉटेलच्या व्यवस्थापकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वेश्याव्यवसायासाठी आणल्या गेलेल्या तीन महिलांना ताब्यात घेतले आहे.

किरण मेघवाळ (वय ४२) असे आरोपी महिलेचे नाव असून ती एकता हॉटेल ब्रिस्टो फुड बारमध्ये काही महिलांना बोलावून त्यांच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक दीपक शेळके व त्यांच्या पथकाने शनिवारी दुपारी या हॉटेलमध्ये एक बनावट ग्राहक पाठवत किरण मेघवाळ या महिलेकडे वेश्यागमनासाठी महिलेची मागणी केली. यावेळी किरण हिने बनावट ग्राहकाकडून पैसे स्वीकारल्यानंतर पोलिस पथकाने या हॉटेलवर छापा मारून किरणसह तीन महिलांना ताब्यात घेतले. यावेळी एकता हॉटेलचा मॅनेजर कुणाल पारकरसह किरण मेघवाळ हिच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT