मुंबई

महाराष्ट्र दिनी मतदारांसाठी विशेष उपक्रम

CD

सेल्फी पॉईंट, सह्यांची मोहीम, मुंबईसह परिसरात मोठा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीविषयक विविध उपक्रम सुरू आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्याच्या मुख्य समारंभात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सेल्फी पॉईंट, सह्यांची मोहीम यासह प्रत्यक्ष संवादावर भर देऊन मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती ‘स्वीप’ च्या मुख्य समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचा मुख्य समारंभ हा दादर पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आज झाला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव आदी उपस्थित होते.
यावेळी मतदार जनजागृतीविषयक संदेशांसह सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. तसेच येत्या २० मे रोजी ‘मी अवश्य मतदान करणारच!’ या संदेशासह सह्यांसाठीचे फलकही उभारण्यात आले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे स्टेशनवर काम करणारे हमाल बांधव, अंगणवाडी सेविका, कम्युनिटी हेल्थ वर्कर, परिचारिका, होमगार्ड, पोलिस, मुंबई अग्निशमन दल, आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT