मुंबई

तुम्हाला पसंतीचा वाहन क्रमांक हवाय का?

CD

नवी सीरिज सुरू, वडाळा आरटीओकडून आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली एमएच ०३ ईएम (MH०३EM) ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी एमएच ०३ ईएन (MH०३EN) नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. ही मालिका २ मे पासून सुरू केली जाणार आहे.

ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा आहे. त्यांना विहित नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅन कार्ड आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा आरटीओ, मुंबई (पूर्व यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह २ मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) कार्यालयात सादर करण्याचे आवाहन वडाळा आरटीओ कार्यालयाचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे.
--
जास्त अर्ज आल्यास लिलाव
एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या ८ मे २०१६च्या अधिसूचनेनुसार नियमित शुल्काव्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणाऱ्यास हा नोंदणी क्रमांक देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT