मुंबई

जगदगुरू शंकराचार्यांच्या हस्ते ‘शंकरालयम’वर महाकुंभाभिषेकम

CD

जगद्‌गुरू शंकराचार्यांच्या हस्ते ‘शंकरालयम’वर महाकुंभाभिषेकम
बातमीदार
चेंबूर, ता. १ : प्रति शबरीमाला समजल्या जाणाऱ्या मुंबईतील ‘शंकरालयम’चा तिसरा जीर्णोद्धार महाकुंभाभिषेकम सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली. वेद मंत्रांच्या घोषात आणि होमकुंडाच्या पवित्र अग्नितून प्रज्वलित झालेल्या ऊर्जेत जगद्‌गुरू बदरी शंकराचार्यांनी तृतीय जीर्णोद्धार महाकुंभाभिषेकम केले.


चेंबूर येथे २००२ला शंकरालयम मंदिराची स्थापना करण्यात आली. दर १२ वर्षांनंतर मंदिरातील अयप्पाच्या मूर्तीला ऊर्जावान करावी लागले. २००२ आणि २०१४ मध्ये शंकरालयम येथे महाकुंभाभिषेकम सोहळा झाला. जगद्‌गुरुंच्याच हस्ते हा सोहळा पार पडला होता. महाकुंभाभिषेकम सोहळ्याचे धार्मिक विधी पुरोहित ब्रम्हश्री लक्ष्मीनारायणा सोमय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडला. सोहळ्यानिमित्त मंदिरात भजन, कीर्तन, नामसंकीर्तन, सत्संग सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामूहिक प्रार्थना धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक घटनेचे साक्षी होण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मुंबईतल्या चेंबूरमधील चार मजली शंकरालयम हे भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे. ज्या भाविकांना केरळमधील अय्यपाच्या म्हणजेच शबरीमाला देवस्थानाला जाणे शक्य होत नाही ते भाविक चेंबूरच्या ‘शंकरालया’ला भेट देत असतात.

या सोहळ्यास भारताचे ॲटर्नी जनरल आर वेंकटरमणी, त्रावणकोर राजघराण्याच्या यूवराज्ञी आणि तिरुअनंतपुरमची महाराणी, श्रीमती थंब्रत्ती, भारताचे माजी शास्त्रीय सलागार डॉ. आर. चिदंबरम्, शापूरजी आणि पालनजीचे व्यवस्थापकीय संचालक शापूरजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT