मुंबई

बाळगंगा धरण अंगलट आल्याने तटकरे भीतीपोटी पळाले

CD

बाळगंगा धरण अंगलट आल्याने तटकरे भीतीपोटी पळाले
- आमदार जितेंद्र आव्हाड
पेण, ता. २ (वार्ताहर) : भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षांत देशामध्ये हुकूमशाही आणली असून गोरगरीब जनतेला फुकट धान्य देत अधिक लाचार केले आहे. तसेच जीएसटीच्या नावावरून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या भाजपमध्ये बाळगंगा धरण प्रकरण अंगलट अल्याच्या भीतीपोटी सुनील तटकरे गेले असल्याची टीका इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पेण येथे केले. रायगड लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ पेण गांधी मंदिर येथील आयोजित जनसंवाद सभेकरिता स्‍टार प्रचारक म्‍हणून जितेंद्र आव्‍हाड यांनी उपस्‍थिती लावली होती.
या सभेत पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, नुकतेच छगन भुजबळ यांनी तर अख्ख्या महाराष्ट्राला सांगून टाकले की, राज्‍यात पवार आणि ठाकरे यांची लाट आहे. त्यामळे अनंत गीतेंना दिल्लीत रायगडचा आवाज बुलंद करण्यासाठी पाठवा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले. तर ज्या बाळगंगा धरणासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, मात्र अद्यापही धरण पूर्ण झाले नसून पेण तालुक्याचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्‍यामुळे जनतेशी गद्दारी केली त्यांना राजकीय मातीत गाडा, असे आमदार जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार जयंत पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील, शेकापचे पी. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT