मुंबई

तीस वर्षाच्या खासदारकीचा हिशेब द्यावा

CD

तीस वर्षांच्या खासदारकीचा हिशेब द्यावा
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे आव्‍हान
दिवेआगर, ता. २ (बातमीदार) ः तीस वर्षांची खासदारकी व दोन वेळा मंत्री पदाच्या कालावधीत किती उद्योग रायगडमध्ये आणले? किती रोजगार निर्मिती केली, याचा हिशेब गीतेंनी द्यावा, मगच मत मागण्यासाठी जनतेकडे जावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकतेच श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील महिला मेळाव्यामध्ये केले.
यावेळी रुपाली चाकणकर पुढे म्‍हणाल्‍या की, श्रीवर्धनमधून एकवटलेली ही महिला शक्ती सुनील तटकरे यांच्या मागे मोठी ताकद उभी करत आहे. त्‍यामुळे तटकरे जास्त मताधिक्य मिळवतील अशी खात्री यावेळी चाकणकर यांनी व्‍यक्‍त केली; तर केंद्र सरकारने लागू केलेला सीएए कायदा हा आपणा सर्वांना नागरिकत्वाची जबाबदारी देणारा कायदा आहे. याबाबत विरोधक वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत. त्या अफवांना थारा देऊ नका, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. बोर्ली पंचतन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला मेळाव्‍यास बोर्ली पंचतन जिल्हा परिषद गणातून हजारो महिला उपस्थित होत्‍या. या सभेस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती; तर त्यांच्या समवेत विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महमद मेमन इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT